एकतर्फी प्रेमास नकार, तरुणीला अॅसिड पाजलं
प्रेमास नकार दिला म्हणून एका तरुणीला अॅसिड पाजण्यात आल्याची घटना दिल्लीत घडलीय.
नवी दिल्ली : प्रेमास नकार दिला म्हणून एका तरुणीला अॅसिड पाजण्यात आल्याची घटना दिल्लीत घडलीय.
दिल्लीच्या संगम विहारमध्ये ही घटना घडलीय. 18 वर्षांच्या मुलीसमोर आरोपी तरुणानं प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता. एकतर्फी प्रेम धुडकावल्यानं बिथरलेल्या या तरुणानं तरुणीवर अॅसिड हल्ला केला. या तरुणीला पकडून तिला जबरदस्तीनं अॅसिड पाजण्यात आलं.
यामुळे, ही तरुणी गंभीर जखमी झाली. पीडित तरुणीला एम्स रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केलीय. पुढील चौकशी सुरू आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार, अॅसिड हल्ल्यांमध्ये यूपी, एमपी आणि दिल्ली यांचा नंबर सगळ्यात वरचा लागतो. 2014 साली केवळ उत्तरप्रदेशात 185 अॅसिड हल्ल्यांची तक्रार नोंदवण्यात आल्यात.