पणजी : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेता सचिन जोशी यांनी विजय माल्ल्या याच्या मालकीचा गोव्यातील किंगफिशर व्हिल्ला (बंगला) मोठी रक्कम मोजून खरेदी केला. या व्हिल्ला ताबा सचिन यांनी नुकताच घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील १७ बँकातून कर्ज काढले होते. परंतु हे कर्ज न फेडता तो भारतातून फरार झाला. त्याच्याविरोधी न्यायालयीन खटला चालू आहे. बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याने या सर्व बँकानी त्याची ७०० कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. माल्ल्याच्या या मालमत्तेचा बँकांनी लिलाव जाहीर केला आहे. त्यापैकी गोवा येथील हा व्हिल्ला आहे.


 


 


बँकेने केलेल्या लिलावात सचिन जोशी यांनी माल्ल्याचा हा व्हिल्ला खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी तब्बल ७३ कोटींची बोली लावली होती. सचिन जोशी हे विंकींग व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक आहेत. जोशी हे मुंबईचे रहिवाशी आहेत.


 


हा व्हिल्ला ताब्यात घेताना मला आनंद झाला. आज याचा ताबा घेतल्याने मी खूप आनंदी आहे, असे सचिन जोशी म्हणालेत.