चंदीगड : खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्यावरून पेटलेल्या वादात हरियाणातल्या एका मंत्र्यांनी तेल ओतले आहे. महात्मा गांधींचा फोटो काढून टाकला ते बरंच झालं. आता लवकरच नोटांवरचा त्यांचा फोटोही जाईल, असं मंत्री अनिल विज यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री अनिल विज यांच्या या विधानावर काँग्रेसनं सडकून टीका केलीये. तर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मात्र हे विज यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून हात झटकलेत. 



खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याचा वाद निर्माण झाला होता. पण या वादाला आता वेगळं वळणं लागलं आहे. मोदी आणि भाजपला विरोधकांनी टार्गेट करण्यात सुरुवात केली आहे. आता मंत्र्यांनी नवीन विधान केल्याने नवा वाद उद्धभवणार आहे.