पैशाचा वापर करुन भाजपने निवडणुका जिंकल्या : राहुल गांधी
भाजपने निवडणुकीत पैशाचा वापर केला आणि निवडणुका जिंकल्या असा थेट आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.
नवी दिल्ली : भाजपने निवडणुकीत पैशाचा वापर केला आणि निवडणुका जिंकल्या असा थेट आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.
गोवा आणि मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजप दावा केला आहे. या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजप सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने किती लवकर निर्णय घेतला यापेक्षा किती पैसा ओतला हे महत्वाचं आहे, असे म्हणालेत.
पाचपैकी दोन राज्यांमध्ये भाजपाचा तर तीन राज्यांमध्ये आमचा विजय झाला आहे. आम्ही जिंकलेल्या राज्यांमध्ये पैसा आणि आर्थिक ताकदीचा वापर करत लोकशाहीला हिरावण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत. प्रत्येकाला चढ उतार पाहावे लागतात, आम्ही मान्य करतो की उत्तप्रदेशात थोडा उतार पाहावा लागला, अशी कबुली त्यांनी दिली.
यावेळी काँग्रेसमध्ये रचनात्मक बदल करण्याची गरज असल्याचंही ते म्हणालेत. गोव्यात राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं असल्याने आम्हाला दावा करणं कठीण जाणार असल्याचं राहुल गांधी म्हणालेत.