नवी दिल्ली : दलित विद्यार्थी असलेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर आज हैदराबाद युनिव्हर्सिटीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आहे. आज या युनिव्हर्सिटीत जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार दाखल झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूनिव्हर्सिटीत कन्हैया रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणी आंदोलनाला आपला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाल्याचं सांगितलं जातंय. आपल्या या हैद्राबाद दौऱ्यावर कन्हैया रोहित वेमुलाच्या आईची भेट घेणार आहे. २५ मार्च रोजी तो दिल्लीला परतणार आहे.


दरम्यान, युनिव्हर्सिटीनं इथं मीडिया आणि बाहेरच्या लोकांच्या प्रवेशावर बंदी घातलीय. युनिर्व्हर्सिटी परिसरातील सर्व प्रवेश द्वारांवर प्रशासनानं टाळे लावलेत. तसंच २७ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय. मंगळवारी झालेल्या वादानंतर प्रशासनानं अगोदरच सर्व वर्ग सोमवारपर्यंत स्थगित केलेत. इतकंच नाही तर कॅम्पसमध्ये वीज आणि पाण्याचा पुरवठाही बंद करण्यात आलाय.