तामिळनाडूचा मुख्यमंत्री बदलणार ? आमदारांची आज बैठक
एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी AIADMK पक्षाच्या आमदारांची आज चेन्नईमध्ये महत्त्वाची बैठक होतेय. पक्षाच्या महासचिव शशिकला यांना मुख्यमंत्री होण्याची गळ बहुतांश आमदार घालतील, अशी शक्यता आहे.
चेन्नई : एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी AIADMK पक्षाच्या आमदारांची आज चेन्नईमध्ये महत्त्वाची बैठक होतेय. पक्षाच्या महासचिव शशिकला यांना मुख्यमंत्री होण्याची गळ बहुतांश आमदार घालतील, अशी शक्यता आहे.
ओ. पनीरसेल्वम यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी करावी लागेल, असं बोललं जातंय. शशिकला या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्ती मानल्या जातात. मुख्यमंत्री बदलाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये असून आमदारांच्या बैठकीत असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं असलं, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे बहुतांश आमदार शशिकलांनी पद स्वीकारण्याच्या मताचे आहेत.