लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 2022 च्या निवडणुकीत समाजवादी पक्ष सत्तेत पुन्हा येईल असं म्हटलं आहे. सत्तेत आल्यानंतर गंगाजलने मुख्यमंत्री आवास धुवून प्रवेश करेल असं देखील त्यांनी म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवावर आत्मपरीक्षण करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं. पुढच्या १५ एप्रिल पर्यंत आमचं सदस्यता अभियान सुरु होणार आणि संपूर्ण उत्तर प्रदेशात हे अभियान राबवलं जाणार आहे.


योगी सरकारच्या कार्यशैलीवर टीका करत त्यांनी म्हटलं की, 'आता तर फक्त झाडू लागत आहे. आम्हाला माहित नव्हतं की आमचे अधिकारी इतका चांगला झाडू मारतात. आम्हाला माहिती असतं तर आम्हीही खूप झाडू मारायला लावले असते. कत्तलखाने बंद करण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर अखिलेश कुमारांनी म्हटलं की आमचे वाघ उपाशी आहेत त्यांच्या जवळ नका जाऊ. सीएम योगी म्हणतात वयाने ते माझ्यापेक्षा मोठे आहेत पण वयाने काय होतं काम करण्यात तर मागे आहेत ना.'


अखिलेश यांनी भविष्यात महायुतीच्या शक्यतेवर म्हटलं की, 'यावर अजून काहीही बोलता येणार नाही. आमची काँग्रेससोबत आघाडी आहे. त्या दिवसाची वाट बघतोय जसे तुम्ही लोकांना बलात्कार आणि हत्याच्या घटनांमध्ये माझा फोटो सोबत बातम्या दाखवायचे.'