नवी दिल्ली : दहशतवादी संघटना अल कायदानं इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिले...  मंगळवारी ही घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेंट्रल रेल्वेच्या पर्सनल डिपार्टमेंटच्या भुसावळ डिव्हिजनशी निगडीत ही इंडियन रेल्वेच्या वेबसाईटवरची एक मायक्रोसाईट आहे. विभागाच्या प्रशासनिक गरजांसाठी बनवण्यात आलेल्या एका मोठ्या इंट्रानेटचाही हा एक भाग आहे.


अल कायदाचा प्रमुख मौलाना आसिम उमर याच्या नावानं हा मॅसेज प्रसिद्ध करण्यात आला होता. १९९२ मध्ये बाबरी मस्जिद प्रकरण घडल्यानंतर उमरनं जिहादी ग्रुपमध्ये प्रवेश केला होता. 


काय लिहिलं होतं या मॅसेजमध्ये... 


वेबसाईट हॅक झाल्यानंतर त्यावर दहशतवाद्यांनी काही भडकाऊ वक्तव्यही केली. दिल्लीची जमीन पुन्हा एकदा शाह मुहादित देहलवीला जन्म देऊ शकत नाही... जो पुन्हा एकाद भारताच्या मुस्लिमांना जिहादचे विसरणीत गेलेली शिक्षा देऊ शकेल. त्यांना जिहादच्या रणभूमीत उतरण्यासाठी प्रेरित करेल... असं यात म्हटलं गेलं होतं. शिवाय लोकांना यूएस आणि सहकारी देशांना हरविण्यासाठी मदत करण्याचं अपीलही यात करण्यात आलं होतं. 


ही बाब लक्षात आल्यानंतर तत्काळ अधिकाऱ्यांनी प्रकरण आपल्या ताब्यात घेतलं... आणि वेबसाईट पूर्ववत केली.