नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ५०० आणि १००० ची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात खळबळ माजली. लोकांना त्यांच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटा बँका आणि पोस्टात जाऊन बदलता येणार आहे. त्यासाठी वेळ देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवार आणि गुरुवारी सर्व बँका आणि एटीएम बंद ठेवण्यात आले आहेत. पण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व बँका शनिवारी आणि रविवारी सुरु ठेवणार असल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.


देशातील नकली नोटा या मोठ्या प्रमाणात व्यवहारात आणल्या जात होत्या. हा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्य कारण सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर याबाबतची आणखी २५ कारणं सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत.


२ दिवस बँका सुरु असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. १२ आणि १३ नोव्हेंबरला बँकांचे कामकाज सुरु राहणार आहेत.