नवी दिल्ली : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. तशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशामधील राष्ट्रीय महामार्गांवर आता १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी असणार आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर टोलनाक्यांवर कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी यापूर्वी शुक्रवारी, ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली होती. आता यात आणखी तीन दिवस वाढ करण्यात आलेय.



राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी ही टोलमाफीची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. वाहनधारक आणि चालकांना मोठा दिलासा दिला आहे. टोलमाफीच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक सुरळीत होईल, अशी आशा गडकरी यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.