लखनऊ : संगमनगरी अलाहाबादमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो झाले. राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री अखिलेश यादवही होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही प्रचार मिरवणुकांमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांचा प्रचंड उत्साह बघायला मिळत होता. सभा झाल्यानंतर राहुल गांधींनी त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचं जन्मस्थान असलेल्या स्वराज भवनमध्ये वास्तव्य केलं. दुपारनंतर त्यांनी अखिलेश यांच्यासह रोड शोमध्ये भाग घेतला.


युपी को ये साथ पसंत है, काम बोलता है, अशा घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुसरीकडे अमित शाह यांच्या रोड शोमध्ये सगळं वातावरण भगवं झालं होतं. भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या. या दोन रोड शोंमुळे शहरातल्या शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या होत्या.