3:56 Killari! महाप्रलयाच्या 31 वर्षांनंतरही किल्लारीत 48 भूकंपाचे धक्के

29 सप्टेंबर 1993 अंनत चतुर्दशीचा दिवस, मुंबई-पुण्यात विसर्जनाची धामधुम नुकतीच आटोपली होती. काही ठिकाणी बाप्पाचे विसर्जन सुरूच होते. बाप्पाच्या विसर्जनानंतर संपूर्ण महाराष्ट्र साखरझोपेत असतानाच 3 वाजून 56 मिनिटांनी संपूर्ण राज्य हादरले. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरच्या किल्लारी गावात महाप्रलयकारी भूकंप झाला. 

| Sep 30, 2024, 10:58 AM IST

KIllari Earthquake 1993: 29 सप्टेंबर 1993 अंनत चतुर्दशीचा दिवस, मुंबई-पुण्यात विसर्जनाची धामधुम नुकतीच आटोपली होती. काही ठिकाणी बाप्पाचे विसर्जन सुरूच होते. बाप्पाच्या विसर्जनानंतर संपूर्ण महाराष्ट्र साखरझोपेत असतानाच 3 वाजून 56 मिनिटांनी संपूर्ण राज्य हादरले. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरच्या किल्लारी गावात महाप्रलयकारी भूकंप झाला. 

1/8

31 years of Latur KIllari Earthquake 1993 Some facts you must know

 महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप म्हणून किल्लारी भूकंप दुर्घटनेची आठवण येते. आज या घटनेला 31 वर्ष पूर्ण झाले. या दुर्घटनेत 8 हजार जणांचा मृत्यू झाला तर 16 हजार प्राणी दगावले. जवळपास 20 हजारांपेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले.   

2/8

31 years of Latur KIllari Earthquake 1993 Some facts you must know

 लातूरच्या जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तत्कालीन उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचे धाराशिव येथेही भूंकपाचा फटका बसला. दोन्ही जिल्ह्यातील तब्बल 52 गावे उद्ध्वस्त झाली तर 30 हजार घरे कोसळली. 

3/8

31 years of Latur KIllari Earthquake 1993 Some facts you must know

किल्लारी भूकंपाचा सर्वाधिक फटका लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला बसला होता. संपूर्ण गावच्या गावच नष्ट झालं होतं.   

4/8

31 years of Latur KIllari Earthquake 1993 Some facts you must know

किल्लारी येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. तसंच, भूकंपनाभी सुमारे 10 किमी खोल होते. एकाच दिवशी तीन धक्के बसल्याने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली. 

5/8

31 years of Latur KIllari Earthquake 1993 Some facts you must know

किल्लारीच्या आठवणी आजही जागा आहेत. ज्या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात बचावकार्य राबवण्यात आलं. तसंच, पाऊस सुरू असल्याने रोगराई पसरण्याची भितीदेखील होती. 

6/8

31 years of Latur KIllari Earthquake 1993 Some facts you must know

दरम्यान, गेल्या 31 वर्षांत मराठवाड्यासह परिसरात 125 भूकंपाचे धक्के बसले आहेत. तसंच, भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले आहे. काही गावांना सौम्य धक्के जाणवले आहेत. 

7/8

31 years of Latur KIllari Earthquake 1993 Some facts you must know

सप्टेंबर 1993 ते सप्टेंबर 2024 या काळात लातूर परिसरात भूकंपाचे 48 धक्के जाणवले. 1999 मध्ये किल्लारीला 11 धक्के जाणवले. 

8/8

31 years of Latur KIllari Earthquake 1993 Some facts you must know

 2022 मध्ये लातूर जिल्ह्याला 11 धक्के, ऑक्टोबर 2023 मध्ये भूकंपाचे 4 धक्के बसले.