लष्कराच्या मुख्यालयात जवानांसाठी तक्रारपेट्या
लष्करातल्या जवानांना होत असलेल्या त्रासांचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतं आहेत.
नवी दिल्ली : लष्करातल्या जवानांना होत असलेल्या त्रासांचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतं आहेत. या व्हिडिओमुळे लष्कराच्या कारभारावरही टीका व्हायला लागली आहे. यानंतर आता थेट लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे.
जवानांच्या कामावेळी होत असलेल्या त्रासाबाबतच्या तक्रारीसाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या मुख्यालयांमध्ये तक्रारपेटी ठेवण्यात येणार आहे. बिपीन रावत यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. जवानांना कोणतीही तक्रार असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असं आवाहनही बिपीन रावत यांनी यावेळी केलं आहे.