नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे सद्य गव्हर्नर उर्जित पटेल यांची पूर्व पत्नी विभा जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालंय. भ्रष्टाचाराशी निगडीत एका प्रकरणात एका न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विभा जोशी या अमेरिकेत राहतात. उर्जित पटेल यांच्याशी त्यांचा विवाह १९९४ मध्ये झाला होता. २००३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.


काय आहे प्रकरण...


हे प्रकरण विभा जोशी यांचे भाऊ आणि बरखास्त आयएएस अधिकारी अरविंद जोशी आणि त्यांची पत्नी टीनू जोशी यांच्याशी निगडीत आहे. २०११ साली जोशी यांच्या घरातून करोडो रुपयांची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली होती. 


या प्रकरणात अरविंद जोशी यांचे आई-वडिल निर्माला जोशी - एचएम जोशी आणि दोन्ही बहिणी आभा जोशी आणि विभा जोशी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. भ्रष्टाचाराशी निगडीत या प्रकरणात जोशी कुटुंबातील तब्बल १६ जण आरोपी आहेत. त्यांच्यावर आरोपदेखील निश्चित झालेत.


न्यायालयानं आभा आणि विभा यांच्याशिवाय प्रदीप जैन यांना फरार घोषित करून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढलंय.