भुवनेश्वर : नोटबंदीनंतर देशात अनेक बदल पाहायला मिळाले. ४४ दिवसानंतर ही विरोधक या मुद्द्यावर टीका करत आहेत. अनेकांना रोख रक्कमची चणचण भासत आहे. अनेक जण पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांनी देखील वक्तव्य केलं आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशाच्या विरोधात मोदींचा हा निर्णय शेवटचा निर्णय नाही आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशावर सरळ हल्ला करण्यासाठी मोदी आणखी असे अनेक निर्णय घेऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमादरम्यान पनगढि़या यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'नोटबंदी भ्रष्टाचार रोखण्यासाठी शेवटचा निर्णय आहे असं मा नाही म्हणणार. मला वाटतं आणखी काही पाऊलं उचलले जातील. काळापैशा विरोधातील कारवाई आणि नितीगत व्यवस्थेत किंवा भूमिकेत बदल केले पाहिजे.'


'कारवाईबाबत अडथळे नाही आणले पाहिजे. पंतप्रधानांना याबाबत त्यांच्या सल्लागारांशी चर्चा केली पाहिजे. आम्ही बघू आणि वाट पाहू. बजेटमध्ये देखील काही बदलाची अपेक्षा आहे. नोटबंदीआधी आपला जीडीपी विकास दर 7.2 टक्के होता. सध्या आमच्याकडे कोणत्याही सूचना नाही आहेत.'