हैदराबाद : मुस्लीम तरुणांनी इस्लामसाठी जगावे असा सल्ला एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलतांना ओवेसींनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलतांना ओवैसीने आयसीस या दहशतवादी संघटनेवर हल्लाबोल देखील केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातात शस्त्र घेणे म्हणजे जिहाद नाही, संपुर्ण जग तुमचे आहे, त्यामुळे इस्लामसाठी मरण्याऐवजी या जगात जगायला शिका असं ओवैसींनी म्हटलं. दरम्यान, आयसीस ही दहशतवादी संघटना मानवी जातीला कलंक असून जगापुढील सर्वात मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं. आयसीस संघटना इस्लामचे रक्षण करण्याचा भास निर्माण करत असली तरी, या संघटनेचे कृत्य हे इस्लाम विरोधी आहे म्हणून ते आपले शत्रू असल्याचं ओवैसींनी म्हटलं.


आयसीसचा प्रमुख अबु बक्र बगदादी कोणत्याही मुस्लीम नागरिकाच्या हाती लागला, तर त्याचा खात्मा करुन टाका, या शब्दात ओवेसींनी आयसीसवर हल्ला केला. शस्त्र हातात घेण्यापेक्षा गरिबांना मदत करुन जिहाद पाळा असेही ते म्हणाले. भारतातील मुस्लिम युवकांमध्ये दहशतवादी संघाटनांमध्ये सामील होण्याचा किंवा फुटीरतावादी विचारसरणीचा ओढा निर्माण होत असताना ओवैसींनी केलेलं हे वक्तव्य नक्कीच महत्त्वाचं आहे.