कुलभूषण यांच्या शिक्षेवर असदुद्दीन ओवैसी म्हणाले...
मात्र न्यायालयाचा निकाल येण्याआधी सरकारने काहीतरी करायला हवं होतं, असं असदुद्दीन ओवेसीय यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यावर लोकसभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं, पाकिस्तानच्या मिलिट्रीचं न्यायालय हे न्यायालय नसून 'बनाना न्यायालय' आहे, म्हणून एका भारतीयाला कोणताही पुरावा नसताना त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानच्या मिलिट्री न्यायालयाला बनाना न्यायालय म्हटल्यानंतर, संसदेतील बहुतेक खासदारांनी बाकं वाजवून असदुद्दीन ओवैसींना प्रतिसाद दिला.
सरकारने १२ ते १३ वेळेस त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे, मात्र न्यायालयाचा निकाल येण्याआधी सरकारने काहीतरी करायला हवं होतं, असं असदुद्दीन ओवेसीय यांनी म्हटलं आहे.
भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हेरगिरी करण्याच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.