नवी दिल्ली : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसीने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या न्यू इंडिया व्हिजनचा भाग आहे असं ओवैसींनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या वक्तव्यांनी वादात असणारे ओवैसींनी म्हटलं की, 'त्यांना योगींना  मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयाने कोणतीही हरकत नाही आहे. हा निर्णय भारताच्या दीर्घकालीन गंगा संमिश्र संस्कृतीवर हल्ला आहे.'


ओवैसी बोलले की, 'हा मोदीजी आणि भाजपचा न्यू इंडिया आहे. पण हे जरा ही आश्चर्यकारक नाही आहे. समाजवादी पक्ष जेव्हा सत्तेत होती तेव्हा त्यांनी मुस्लीमांना धोका दिला. आता आम्ही खास वर्गाच्या लोकांच्या विकासाचा मॉडल बघू. ते याच विकासाच्या गोष्टी तर करतात.'