अलाहाबाद : एमआयएम पक्षाचे नेते असदउद्दीन ओवैसी यांनी आज, "न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे, नक्कीच न्याय मिळेल, जय हिंद!", असे  म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी असदउद्दीन ओवैसी यांनी म्हटलं होतं,  "माझ्या गळ्यावर कोणी धारदार सुरा ठेवला, तरी मी 'भारतमाता की जय असे म्हणणार नाही".


ओवैसी यांच्या वक्तव्याच्या विरोधात येथील न्यायालयात देशद्रोहाच्या आरोपाखाली जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 


यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, 'न्यायालयावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. न्यायालय न्याय देईल, जय हिंद!'.