नवी दिल्ली : अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू तिहार जेलमध्ये आहे. असं असलं तरी आसाराम बापूचा आचरटपणा काही कमी झालेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाराम बापू सध्या दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. एम्समधल्या एका नर्ससमोर आसाराम बापूनं अश्लिल वक्तव्य केल्याची बातमी इंडिया डॉट कॉमनं दिली आहे.


एम्सची नर्स आसारामला नाश्ता घेऊन आली. तेव्हा तू लोण्यासारखी आहेस, त्यामुळे मला ब्रेडसोबत लोणी कशाला हवं. तुझे गाल सफरचंदासारखे आहेत, तू काश्मीरची वाटतेस, असं आसाराम बापू या नर्सला म्हणाल्याचा आरोप आहे.