नवी दिल्ली : पंजाब मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रेमी युगुलाने घरातून पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर एका आठवड्यातच त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न देखील झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नातेवाईक या लग्नाच्या विरोधात होते कारण हे दोघंही एकमेकांचे भाऊ-बहिण लागत होते. त्यामुळे मुलीच्या पित्याने आणि मुलाच्या भावाने या दोघांवर प्राणघातक हल्ला केला.


मुलीच्या वडिलांनीच मुलीवर हल्ला केला ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. यानंतर वडिलांनी पोलिसात आत्मसमर्पन केलं तर सख्या भावाची हत्या करुन भाऊ फरार झाला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फरार भावाचा शोध सुरु आहे. पण या भागात या घटनेमुळे लोकं चांगलेच हादरले आहेत.