नवज्योत सिद्धूकडून `आवाज-ए-पंजाब`ची घोषणा
भाजपाला सोडचिठ्ठी देणारे नवज्योतसिंग सिद्धू यांनी `आवाज-ए-पंजाब` या पक्षाची औपचारीक घोषणा केली आहे.
चंडीगड : भाजपाला सोडचिठ्ठी देणारे नवज्योतसिंग सिद्धू यांनी 'आवाज-ए-पंजाब' या पक्षाची औपचारीक घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेत सिद्धू म्हणाला, 'फक्त पंजाबच्या विकासासाठी आपण नवीन पक्ष स्थापन केला आहे. समृद्ध पंजाब हाच आपल्या नव्या पक्षाचा मुख्य उद्देश आहे. सरकार लोकांसाठी असते पण पंजाबमध्ये सरकार फक्त एका कुटुंबासाठी आहे. पंजाबमध्ये बादलांसाठी प्रचार करायला सांगितला म्हणून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला'.
'आम आदमी पक्ष किंवा अरविंद केजरीवाल राज्यसभा सोडण्याचे कारण नाही. पंजाबचे नुकसान करणाऱया व्यवस्थेला आम्हाला हलवून सोडायचे आहे, चांगले नेते कमी होऊन मूकदर्शक झाले आहेत. राजकारणातील माझी बारावर्ष नागरिकांच्या सेवेची होती, त्यात कुठला व्यक्तीगत फायदा, काही मिळवण्याचा हेतू नव्हता, पंजाब जिंकावा हीच माझी इच्छा आहे', असंही नवज्योतसिंह सिद्धूने म्हटलं आहे.
‘गेल्या दोन वर्षांपासून आम आदमी पक्षाच नेते आपल्या संपर्कात होते. शिवाय, पंजाबच्या बाहेर रहाण्यासाठी पैशांची ऑफरही मिळाली होती. क्रीडापटू तयार करणारा पंजाब कुठे गेला?, पंजाबचे रस्ते व्यसनांनी भरले आहेत. त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देणे हाच आपल्या पक्षाचा मुख्य उद्देश आहे. शिवाय, पंजाबला समृद्ध करणे हा आवाज ए पंजाबचा मुख्य उद्देश आहे,' असंही नवज्योत सिंह सिद्घूने म्हटलं आहे.