नवी दिल्ली  : योगगुरु बाबा रामदेव यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतलीय. त्यावेळी पंतजली क्रीमचा वापर करुन लालूंचा मेकअपही केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय योगदिनाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जातंय. यावेळी योगगुरु आणि लालू यादव यांनी एकत्र योगाभ्यास केला. इतकंच नाहीतर बाबा रामदेव यांनी पंतजली क्रीमचा वापर करुन लालूंचा मेकअपही केला.


यावेळी लालूंनी योगगुरुंवर स्तुतीसुमनं उधळलीत. बाबा रामदेव यांचं योगक्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्याचं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलंय. त्याचवेळी लालूंनी रामदेव यांच्या पंतजली उत्पादनांचंही कौतुक केले.