कानपूर : नोटबंदीमुळे त्रस्त असलेल्या एका गर्भवती महिलेने बँकेत लाईन लावली आणि तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या. यानंतर या महिलेने बँकेतच मुलाला जन्म दिला. बँकेत जन्माला आल्याने लोकांनी या मुलाचं नाव खजांची नाथ ठेवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील शाहपूरमधील सदारपूर गावातील सर्वेषा देवी यांचा हा पाचवा मुलगा आहे.


आई आणि बाळाची प्रकृती ठिक आहे. 2 डिसेंबर रोजी  सर्वेषा देवी झिंझक भागातील पंजाब नॅशनल बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या, त्या सकाळी अकरापासून रांगेत होत्या, तेथेच प्रसुती वेदना सुरू झाल्या.


नोटबंदीमुळे सर्वेषा देवीने मुलाला बँकेत जन्म दिला आणि म्हणून त्याचं नाव खजांची नाथ ठेवण्यात आलं आहे. महिलेच्या प्रसुती वेदना रांगेतील लोकांनी पाहिल्या आणि त्यानंतर त्यांनी 108 नंबरला फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली, पण वेदना अधिक वाढत गेल्या आणि काही महिलांनी बँकेतच एक राऊंड तयार केला आणि तिला मुलाला जन्म देण्यास मदत केली.