सरहानपूर : उत्तरप्रदेशच्या सरहानपूरच्या एका नर्सिंग होममध्ये एका 'जलपरी'नं जन्म घेतला... पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या चिमुरडीची जगण्याची धडपड अपयशी ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मुलगी एखाद्या माशाप्रमाणे दिसत होती. तिला पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ही अतिशय दुर्मिळ गोष्ट असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. यापूर्वी ७ मे १९८८ रोजी फ्लोरिडामध्ये असा प्रसंग पाहायला मिळाला होता.


सरहानपूरच्या लेबर कॉलनीतल्या सहीराम हॉस्पीटलमध्ये एका गर्भवती महिलेनं २९ एप्रिल रोजी सकाळी या महिलेनं एका मुलीला जन्म दिला. या मुलीचं डोकं आणि धड सामान्य बाळाप्रमाणेच होतं... पायाकडचा भाग मात्र माशाप्रमाणे होता. शिवाय या मुलीला लैंगिक अवयवही नव्हते. या मुलीनं जन्मानंतर अवघ्या काही तासांत या जगाचा निरोप घेतला.