इंफाळ : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळालं. भाजप आणि काँग्रेसमध्ये येथे मुख्य लढत होती. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात आहे तर भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडच्या एकूण ७० जागांच्या निवडणुकीत भाजर ५१ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस १५ आणि इतर ४ जागांवर पुढे आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसतांना दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि मुख्यमंत्री हरीश रावत किच्छा विधानसभा येथून १९५९ मतांनी पिछाडीवर मागे चालत आहेत. हरीश रावत दोन विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवत आहेत. नैनीताल येथून भाजपचे संजीव आर्य आणि भीमताल येथून अपक्ष राम सिंह कैडा पुढे आहेत. उत्तराखंड भाजपचे प्रवक्ते आणि विकासनगर येथून भाजपचे उमेदवार मुन्ना सिंह चौहान यांनी दावा केला आहे की राज्यात भाजप सरकार बनवणार आहे.


काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले उत्तराखंडचे माजी मंत्री हरक सिंह रावत 6267 मतांना पुढे आहेत. काशीपूर, बाजपूर, गदरपूर, बागेश्वर आणि कपकोट येथून भाजपचे उमेदवार पुढे आहेत.