पायानं पेपर लिहून... त्यानं पटकावले 80 टक्के मार्क्स!
कर्नाटकच्या एका मुलानं आपल्या जिद्दीचा आणि कष्टाचं अनोखं उदाहरण समोर ठेवलंय.
कर्नाटक : कर्नाटकच्या एका मुलानं आपल्या जिद्दीचा आणि कष्टाचं अनोखं उदाहरण समोर ठेवलंय.
कर्नाटकातल्या बेल्लारी शहरानजिक असलेल्या वीराशैव कॉलेजचा मुस्तफा हा विद्यार्थी... मुस्तफाला हात नाहीत... आपल्या पायांमध्ये पेन पकडून या मुलानं कर्नाटक प्री यूनिव्हर्सिटी परीक्षा दिली... या परिक्षेत त्यानं 80 टक्के मिळवलेत. कुणाच्याही साहाय्याशिवाय त्यानं हे यश मिळवल्याचा त्याला जास्त आनंद आहे.
मुस्तफा हा कोल्कगल या गावचा रहिवासी... त्याचे वडील दसगीर साब हे एक लॉरी ड्रायव्हर आहेत. आई मकबूल बानू आणि वडिलांसोबत मुस्तफा राहतो.
भविष्यात आपल्याला आयएएस व्हायचंय, अशी इच्छा मुस्तफा व्यक्त करतो.