मुंबई : रीझर्व्ह बॅंकेकडे योग्य प्रकरणात सीआरआर न राखल्यामुळे राज्यातल्या १२ बँकांवर टाच येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात उत्तर महाराष्ट्रातल्या  नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्हा बँकांचा समावेश आहे. तर  परभणी, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलडाणा आणि कोल्हापूर या बँकांवरही संक्रांत येण्याची शक्यता आहे. 


या सर्व म्हणजे १२ बँका सीआरआरचा दर राखू शकलेल्या नाहीत. सीआरआर अर्थात कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला तिच्याकडे असलेल्या एकूण रकमेचा काही हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. या रकमेचं प्रमाण म्हणजेच सीआरआर...


जिल्हा बँकांसाठी रिझर्व्ह बँकेनं 9 टक्क्यांचा भांडवल पर्याप्तता प्रमाण दर ठरवून दिलाय. या बँकांच्या NPA (non performing asset) मध्ये वाढ झाल्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झालीय. बँकांना वाचवण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपये ओतावे लागतील.