नवी दिल्ली : अनेक जण आपले लग्न नेहमी चर्चेत राहावे म्हणून काय करतील याचा नेम नाही. अनेकांनी विमानात, धावत्या रेल्वेत, पाण्याखाली विवाह केल्याची घटना आहेत. मात्र, या लग्नात चक्क नववधूही अशी काही नाचली की, तुम्ही तो डान्स पाहून थक्क व्हाल. भारतीय नववधुचा डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नववधू स्टेजवर डान्स करत होती. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर क्षणात हजारो लाईक्स मिळाल्या आहेत.