लखनऊ : उत्तर प्रदेशामधील शाहजहापूर येथे एक धक्कादायक घटना घडली. पत्नी सुंदर दिसते म्हणून एका माथेफिरु पतीने तिचे नाक चावले. जेणेकरुन तिचा सुंदर चेहरा विद्रुप दिसवा.


संजीव राठोड असे या माथेफिरुन पतीचे नाव आहे. आपल्या पत्नीचे दुसऱ्याबरोबर सूत जुळले आहे, असा तो पत्नीवर संशय घ्यायचा. या संशयातूनच त्याने हे विकृत कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे. संजीव याच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत.
 
संजीव याला सहा वर्षांची मुलगीदेखील आहे. संजीव खूप तापट आणि रागीट स्वभावाचा आहे, असे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी पत्नी फोनवर कोणाशीतरी बोलत होती, हे पाहून संजीवचा पारा चढला. त्यानंतर पती-पत्नी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी पतीने पत्नीचे नाक चावले, अशी माहिती एका शेजाऱ्याने दिली. संजीव दारुच्या नशेत होता असेही त्याने सांगितले.
 
पत्नीचे नाक चावल्याने संजीवच्या सासरच्यामंडळींनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. दरम्यान, आरोपी पती संजीव फरार आहे.