बेळगाव : बेळगावात कन्नडिगांची मुजोरी सुरुच आहे. महापौर आणि उपमहापौरांच्या नामफलकाला काळं फासण्यात आले आहे. कालच्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरु केलेय. कर्नाटकच्या बस सीमेवरच रोखण्याचा प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्नडिगांची मुजोरी सुरुच असून आमदार संभाजी पाटील यांच्या नाम फलकालाही काळं फासण्यात आले आहे. कन्नड रक्षण वेदिका कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. महापालिका कार्यालयातल्या नामफलकांना काळं फासण्यात आले.


काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्याबद्दल कर्नाटकच्या नगरविकास खात्याने महापौर आणि उपमहापौरांना करणे दाखवा नोटीस बजावून महानगरपालिका बरखास्तीचा इशारा दिला आहे. 1 नोव्हेंबरला काळा दिन रॅलीत महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजिव शिंदे यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सहभाग घेतला होता. 


याविषयी कन्नड संघटना आणि कन्नड प्रसार माध्यमांनी महापौर, उपमहापौर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. सरकारने काळ्या दिनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडून मागवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यावर नगरविकास खात्याने महापौर आणि उपमहापौरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. समर्पक उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.