बंगाल टायगरचे अस्तित्त्व धोक्यात
पश्चिम बंगालची ओळख असणाऱ्या बंगाल टायगरचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. रॉयल बंगाल टायगर ही महत्त्वाच्या 8 प्रजातींपैकी एक आहे. परंतु या शतकाच्या शेवटी या बंगाली प्रजातीचे अस्तित्त्व नष्ट होईल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
न्यूयॉर्क : पश्चिम बंगालची ओळख असणाऱ्या बंगाल टायगरचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. रॉयल बंगाल टायगर ही महत्त्वाच्या 8 प्रजातींपैकी एक आहे. परंतु या शतकाच्या शेवटी या बंगाली प्रजातीचे अस्तित्त्व नष्ट होईल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
बंगाली वाघांप्रमाणेच आणखी काही प्राण्यांच्या प्रजातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये हा धोका मोठा आहे. याच क्षेत्रात जगातील सर्वात जास्त जैवविविधता आढळते. ‘जैवविविधतेतील घट हा हवामान बदलापेक्षाही अधिक गंभीर मुद्दा आहे’ असे पशु संरक्षण संस्थेच्या पीटर लिंड्से यांचे म्हणणे आहे.