श्रीनगर : जम्मू कश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा उद्देश समोर आला आहे. लश्कर-ए-तैयबाचे तीनही दहशतवादी हे जम्मूच्या सांबामध्ये चालत्या रेल्वेमध्ये ब्लास्ट करणार होते. यानंतर त्यांचा उद्देश ट्रेन किंवा आर्मी कँपवर केमिकल फेंकण्याचा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटेलिजेंस सूत्रांच्या माहितीनुसार इतिहासात पहिल्यांदा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्य़ारं आणि गोळादारु मिळाला आहे. दहशतवाद्यांकडे चेन्ड आईईजी, सुसाइड बेल्ट आणि विस्फोटकांनी भरलेली बॅग मिळाली आहे. उरी हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे देखील अशाच प्रकारचं केमिकल मिळालं होतं.


जहशतवाद्यांकडे कम्यूनिकेशनचे चांगले उपकरणं देखील मिळाले आहेत. ज्याच्या मदतीने ते पाकिस्तानमधील त्यांच्या लोकांशी संपर्कात होते. त्यांच्याकडे एनर्जी ड्रिंक देखील मिळालं आहे.


मंगळवारी नगरोटा आणि चमलियालमध्ये झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे दोन अधिकारी आणि ५ जवान शहीद झाले होते. दरम्यान ३ दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं असून अजूनही सर्च ऑफरेशन सुरु आहे.