पाटणा : महाराष्ट्र दुष्काळाचा कहर दिसून येत आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये उकड उन्हामुळे वेगळची समस्या उभी राहिलेय. येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवण करण्यावर बंदी घालण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडक उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटनांत वाढ झालेय. त्यामुळे राज्य सरकारने ही बंदीचा निर्णय घेतलाय. बिहार सरकारने सकाळी नऊ ते सहा या वेळेत ग्रामीण भागात होमहवन करण्यावर तसेच अन्न शिजवण्यावर बंधने घातली गेलेय.


नागरिकांनी यावेळेत आगाशी संबंधित कोणतेही काम करू नये, असे निर्देशच राज्य सरकारच्या आपत्कालीन विभागाने दिलेत. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या लखीसराई आणि दरभंगा जिल्ह्यांमध्ये आगीच्या घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर पाटणा, नालंदा, भोजपूर, बक्सर, रोहतास, भाबुआ यासह अन्य जिल्ह्यांसाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.