नवी दिल्ली : सीएनजीवर धावणाऱ्या बाईक आणि स्कूटरचं नवी दिल्लीत लॉचिंग करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीला हिरवा झेंडा दाखवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक किलो सीएनजीवर ६० किमी धावणाऱ्या या दुचाकीची किट इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं बनवलीय. या सीएनजी दुचाकीमध्ये दोन सिलिंडर असतील. प्रत्येक सिलिंडरची क्षमता एक किलो सीएनजी इतकी आहे.  या सीएनजी दुचाकीमुळं प्रवास खर्च ४० टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


राजधानी दिल्लीमध्ये वाहनांमुळे होणा-या प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. राजधानातील हवा प्रदूषणापैकी तीस टक्क्यांहून अधिक प्रदूषण हे दुचाकीमुळं होते. सर्वसामान्य माणसंही दुचाकी वापरत असल्यानं सम-विषय फॉर्म्युलामधून दुचाकींना वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. दिल्लीतला हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशभर हा प्रयोग राबवला जाणार आहे.