गुवाहाटी :  आसाममध्ये १५ वर्षांची सत्ता उलथून लावत भाजपने पहिल्यांदा ईशान्यकडील राज्यात आपला झेंडा रोवला आहे. 


स्पष्ट बहुमताकडे वाटचाल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपप्रणित आघाडीनं स्पष्ट बहुमताकडं वाटचाल सुरू केली आहे. 


भाजपची मुसंडी 


आसाममध्ये विधानसभेच्या १२६ पैकी ११६ जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी भाजप, आसाम गण परिषद व बोडो पीपल्स फ्रंट ही युती तब्बल ७३ जागांवर आघाडीवर आहे. तर, १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला केवळ २४ जागांवर पुढं आहे. 


मुस्लिम मतांचे राजकारण 


मुस्लिम मतांचे राजकारण करणाऱ्या बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटची (एआययुडीएफ) १५ जागांवर सरशी झाली आहे. इतर ५ जागांवर पुढं आहेत.