अरुणाचल प्रदेशमध्ये उलथा पालथ, भाजपनं केली सत्ता स्थापन
देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष उत्तरप्रदेशकडे लागलं असताना अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र मोठी उलथा पालथ झाली आहे. सत्ताधारी पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल मधून निलंबित करण्यात आलेले मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह 33 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
इटानगर : देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष उत्तरप्रदेशकडे लागलं असताना अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र मोठी उलथा पालथ झाली आहे. सत्ताधारी पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल मधून निलंबित करण्यात आलेले मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह 33 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
६० सदस्यीस विधानसभेत भाजपचे ११ अधिक ३३ असे मिळून ४४ आमदार झाले आहेत. या संख्याबळाच्य जोरावर भाजपनं अरुणाचलप्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली आहे. या 33 आमदारांव्यतिरिक्त दोन अपक्ष आमदारही भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनीही ट्विट करुन अरुणाचलमध्ये भाजपनं सत्ता स्थापन केल्याचं म्हटलं आहे.