नवी दिल्ली : सरकारने 'ईपीएफ'च्या विषयावर माघार घेतल्यानंतर राहुल गांधींनी त्याचे श्रेय घेतले. यावर भाजपचे अनेक समर्थक भडकले आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझा दबाव कामी आला... नोकरदार वर्गाची छळवणूक करण्याविरोधात मी सरकारला इशारा दिला होता. मध्यम वर्गाचे सरकार शोषण करत आहे असे मला वाटल्याने मी सरकारवर दबाव टाकला. मला आनंद आहे की सरकारने यावर माघार घेतली आहे,' अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी सरकारनं 'ईपीएफ'बाबतचा आपला निर्णय मागे घेतल्यानंतर देऊन याबाबतचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. 


राहुल गांधींच्या या वक्तव्यचा समाचार घेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'काँग्रेस सत्तेत असताना या वर्गाला कोणतेही सुरक्षा कवच दिले नव्हते, असं म्हटलं होतं. 


त्यापेक्षाही पुढे जाऊन ते म्हणाले 'राहुल गांधींना श्रेयच घ्यायचे असेल तर जीएसटी विधेयक आणि इतर महत्त्वाची विधेयके पारित करावे आणि त्याचंही श्रेय घ्यावं, असा टोमणा त्यांनी मारलाय. 


संसद शांततेत सुरू ठेवली तर ही विधेयके पारित होण्यास मदत होईल, असंही त्यांनी म्हटलंय. 'संसदेचे कामकाज रोखून राहुल गांधी गरीब जनतेचे नुकसान करत आहेत. ही काही भाजपची विधेयके नाहीत, तर देशाची विधेयके आहेत' असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावलाय.