तिरुवनंतपूरम : माजी केंद्रीय मंत्री ओ. राजगोपाल यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत केरळ विधानसभा निवडणुकीत एका वेगळा इतिहास रचला आहे. केरळच्या विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे ते भाजपचे पहिले उमेदवार ठरले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, राजगोपाल यांनी तिरुवनंतपूरम विधानसभा क्षेत्रात ८००० हून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सिवनकुट्टी यांचा पराभव केला आहे. त्यांच्या विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.


राजेत्तन या नावाने प्रसिद्ध असलेले राजगोपाल यांचं वय ८६ वर्ष आहे. राजगोपाल यांनी राजकीय जीवनाची सुरुवात १९६० मध्ये भारतीय जनसंघामधून केली होती. ते त्यावेळेस राज्य अध्यक्षही झाले. १९८० मध्ये ते पहिल्यांदा निवडणुकीत उतरले होते. १९८० मध्ये कासरगोड या मतदारसंघातून त्यांना पहिला पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर १९८९ मध्येही त्यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत १९९१, १९९९, २०१४ आणि २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर ट्विट करत म्हटलं आहे की, त्यांनी केरळमध्ये दशको-दशक, एक-एक वीट जोडत भाजपला राज्यात उभं करणाऱ्यांना माझा नमस्कार. त्यांच्यामुळेच आम्ही हा आज दिवस पाहिला.