नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पाक व्याप्त काश्मीर आणि गिलगीटमध्ये लोकसभेच्या जागेची मागणी केली आहे. निशिकांत दुबे यांनी याबाबत निशिकांत दुबे यांनी लोकसभेत एक विधेयक सादर करावे असंही म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर बोलताना पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. तोच धागा पकडून खासदार दुबे यांनी ही मागणी केली आहे.


केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी काही दिवसांपूर्वीही पीओके, गिलगीट आणि बलुचिस्तान येथील नागरिकांचा स्वातंत्र्यासाठी कौल घेण्याची मागणी केली होती. तसेच जम्मू काश्मीर ते सांबा या तिरंगा यात्रेच्या शुभारंभवेळी पीओकेमध्येही भारताचा तिरंगा फडकावण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला होता.