पंजाबच्या विकासासाठी संधी द्या, भाजपची जाहीरनाम्यात साद
पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी आज भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.
चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी आज भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीरनामा घोषीत करताना विकासासाठी भाजपला एक संधी देण्याचे आवाहन केलय.
भाजपच्या जाहीरनाम्यात दलित आणि आणि मागास कुटुंबासाठी घरासाठी भूखंड देणे, अडीच एकरापेक्षा कमी जमिन असणा-या शेतक-यांना कर्जमाफी, गरीब मुलींसाठी पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण, स्वस्त दरात दोन किलो तुपाचे डबे आणि पाच किलो साखर अशा अनेक योजंनानी भरलेला आहे. भाजपशासित इतर राज्यांप्रमाणेच पंजाबचाही विकासदर वाढेल अशी प्रतिक्रिया जेटली यांनी दिली आहे.