मुंबई : ब्रसेल्समध्ये स्फोट झाल्यानंतर काही तासांतच दिल्लीहून निघालेल्या जेट एअरवेजच्या 5 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी कंपनीला मिळाली. यापैकी तीन विमानं अनुक्रमे गोरखपूर, चंदिगड आणि डेहराडूनला पोहोचली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चेन्नईकडे उड्डाण करण्याच्या तयारीत होतं. हे विमान तातडीनं रिकामं करण्यात आलं आणि त्याची तपासणी करण्यात आली. 


पाचव्या विमानानं मात्र चेन्नईसाठी आधीच उड्डाण केलं होतं. हे विमान नागपूरला वळवण्यात आलं. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान रिकामं करण्यात आलं. त्याचीही कसून तपासणी करण्यात आली. 


जेट एअरवेजनं ट्विटरवरून प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त केलीये. मात्र प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेला कंपनी प्राधान्य देत असल्याचं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलंय.