नवी दिल्ली : हरियाणामधील भाजपचे मंत्री अनिल विज यांच्यानंतर असदुद्दीन ओवैसीने राष्‍ट्रपिता महात्मा गांधींवर एक विवादित वक्तव्य केलं आहे. त्यामुळे यावरुन आता अजून वाद होण्याची शक्यता आहे. ओवैसीने दलित मतांवर डोळा ठेवत डॉ. भीमराव अंबेडकर यांना महात्मा गांधींपेक्षा मोठे असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवैसीने नोटबंदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ओवैसीने ३८ मिनिटाच्या भाषणात ५५ वेळा मोदींचं नाव घेतलं. भाजप आणि समाजवादी पार्टीवर त्यांनी टीका केली. पण बसपा आणि काँग्रेसवर काहीही बोलले नाही.


ओवैसीने म्हटलं की, नोटबंदीमुळे भ्रष्टाचार आणि गरीबी नाही संपणार. उलट यामुळे गरीबांना संपवण्याची तयारी होत आहे. आता तर जवानांच्या जेवनातही भ्रष्टाचार होत आहे. जवानांना पोटभर जेवनही नाही दिलं जात असल्याचं असदुद्दीन ओवैसींनी म्हटलं आहे.