श्रीनगर : जम्मूमधील नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचं आणखी मोठं नुकसान झालं असतं. जर दोन जवानांच्या पत्नींनी धैर्य दाखवलं नसतं. लष्कराच्या कॉटर्समध्ये राहणाऱ्या या जवानांच्या पत्नींमुळे मोठं संकट टळलं. या दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह ७ जवान शहीद झाले. तर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांच्या गणवेशात दहशतवाद्यांनी आर्मीच्या यूनिटवर हल्ले केला तेव्हा त्यांचा उद्देश लष्कराच्या फॅमिली क्वॉर्टर्समध्ये घुसण्याचा होता. कारण त्यांना तेथे जवानांच्या कुटुंबियांना बंधक करायचं होतं. आपल्या नवजात बालकांसोबत तेथे असलेल्या दोन महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे दहशतवाद्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. एका लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, दोन जवानांच्या पत्नीने धाडस दाखवत घरात असलेल्या वस्तूंच्या साह्याने क्वार्ट्समध्ये येण्याचा रस्ता बंद केला. ज्यामुळे दहशतवाद्यांना आतमध्ये येणं कठीण झालं.


जर या शूर महिलांनी वेळीच हे धैर्य दाखवलं नसतं तर दहशतवाद्यांनी अनेकांना नुकसान पोहोचवलं असतं. दहशतवादी दोन बिल्डींगांमध्ये घुसले त्यानंतर जवानांनी तेथून १२ जवान, २ महिला आणि २ लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढलं. यादरम्यान एक अधिकारी आणि २ जवान शहीद झाले.