जैसलमेर : गंगानगरलगतच्या सीमा भागात पाकिस्तानमध्ये मोठी हालचाल दिसत आहे. उरी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाई होण्याच्या शक्यतेनंतर हा हालचालींना वेग आला आहे. यामध्ये पाकिस्तान आर्मी आहे की रेंजर्स हे मात्र कळू शकलेले नाही. याबद्दल सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आयजी डॉ. बी.आर. मेघवाल यांनी सांगितले, की जर युद्ध झाले तर पाकिस्तान पुन्हा युद्ध करण्याच्या लायकीचा राहाणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेघवाल यांनी सांगितले, की उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर राजस्थानच्या सीमा भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आम्ही कमांडर्सची तातडीची बैठक बोलावली आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यास तयार राहाण्यास सांगण्यात आले आहे. बॉर्डरवर बीएसएफ सर्व प्रकारे सक्षम आहे.
 
पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवर आयजी मेघवाल म्हणाले, आता खूप झाले. 'ईट का जवाब पत्थर से देने का वक्त है'. कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. 


जवान पूर्णपणे तयार आहेत. बीएसएफच्या रोलबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले आम्ही सर्वप्रकारे तयार आहोत.