रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर यादव नावाच्या जवानाचा व्हिडीओ फिरत आहे. यात जवानांची किती वाईट अवस्था आहे याची व्यथा मांडली आहे. जवानांना सरकारकडून मिळणारे साहित्य बाजारात नेऊन विकले जात असून सैन्यातील बडे अधिकारी यात गुंतल्याचा आरोप या जवानाने केला आहे... पाहू या या व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादव नावाच्या जवानाने हा व्हिडीओ तयार केला आहे. यात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 


 



 


जवानाचे आरोप :


१. जवानांना पाठवले जाणारे साहित्य आमच्यापर्यंत पोहोचत नाही.


२. हे सर्व सामान सैन्यातील अधिकारी हडप करतात


३. मोठ्या पदावरील अधिकारी जवानांसाठी आलेले सामान बाहेर विकतात.


४. अधिका-यांमुळे वेळेवर जेवणही मिळत नाही.


५. अनेकवेळा उपाशी झोपावे लागते.


६. आपण मागे व्हिडीओमध्ये पाहत असलेला बर्फ सुंदर दिसत असेल परंतू इथे १२ तास थांबणे किती कठीण आहे, हे इथे आल्यावर कळेल.


७. सकाळी ६ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडा पहारा देतो. परंतु जेवण दिले जात नाही.


८. सकाळचा नाश्ता मध्ये फक्त एक पराठा असतो. त्यात लोणचं किंवा इतर कोणतीही भाजी नसते.


९. जेवणात फक्त पिवळी दाळ आणि भात असतो.


१०. हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर माझ्या जीवाला धोका होईल. जिवंत असेन किंवा नसेन माहित नाही.


११. अधिका-यांचे धागेदोरे खूप लांब पर्यंत आहेत.


१२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, या गैरव्यवहाराची चौकशी करावी.


 



ऐवढ्यावर या जवानाने आपली व्यथा मांडली नसून यांचे पुरावे सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अपुरे जेवण, सुविधांचा तुटवडा 
याबाबतचे ३ व्हिडीओ यादव यांनी तयार केले आहेत.