नवी दिल्ली :  पाकिस्तान आपल्या कुटील कारवाया थांबवणे बंद करत नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे सैनिक सीमा भागातील गावांना जाणूनबुजून  लक्ष्य करीत आहेत. २९ सप्टेंबरला झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाक आपली इज्जत वाचविण्याचे प्रयत्न करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून भारतीय भागात करण्यात आलेल्या फायरिंगला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युतर दिले. त्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानी रेंजर्सने गुडघे टेकले. त्यामुळे आता सीमावर्ती भागात शांतता आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने आपल्या सैनिकांना आदेश दिले की, बदला घेण्यासाठी बीएसएफ, लष्कर आणि सामन्य भारतीयांना लक्ष्य करा. त्यामुळे दोन्ही देशांच्या पश्चिम सीमेवर झालेल्या ५०० चकमकीत सर्वाधिक प्रकरणे गेल्या दोन आठवड्यात झाले आहेत. 


पाकिस्तानचे लष्कर आणि आणि रेंजर्सने जम्मूच्या अखनूर भागात गोळीबार केला. त्यानंतर भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. मग घाबरलेल्या पाक रेंजर्सने गुडघे टेकले आणि पांढरे झेंडे दाखवून गोळीबार बंद करण्याचे आव्हान केले. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहे.