नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशऩाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक कामकाज सुरळीत चालू देतील, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. तसं आश्वसनचं विरोधकांनी दिल्याचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाआधी पंतप्रधानांनी म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


शिवाय या अधिवेशऩाकडे जगाचे लक्ष असल्याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिलीय. त्यामुळे आता संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टाकलीय.


 


दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या अभिभाषणानं आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली. चर्चा आणि वादविवाद हा लोकशाही यंत्रणेचा प्राण आहे. पण संसदेत गोंधळ घालून कामकाज बंद पाडणं योग्य नसल्याचं राष्ट्रपतीनी म्हटलंय.


 


संसदेच्या अधिवेशऩाच्या तोंडावर देशातल्या उद्भवलेल्या विविध वादांच्या पार्श्वभूमीवर संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींनी संसदेच्या गोंधळाबद्दल याआधीही अनेकदा चिंता व्यक्त केलीय. आजच्या भाषणात गेल्या वर्षभरात सरकारनं राबवलेल्या योजनांची भरभरून माहिती देताना पाकिस्तानच्या मुद्द्यावरही आपल्या भावना व्यक्त केल्या.