शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यात मोठी दुर्घटना आज सकाळी घडली. बस नदीत कोसळून जवळपास ४४ लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भीषण दुर्घटनेत ४४ प्रवाशांच्या मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर काही जण नदीत वाहून गेल्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचाही अंदाज आहे.


टॉन्स नदी पुलावर बस दुर्घटना सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास घडली. बसमधून ५० लोक प्रवास करीत होते. बस नदीत कोसळल्यानंतर एकच हाहाकार माजला. स्थानिकांनी बसमधील लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. बचावकार्यासाठी प्रशासनाटचे पथकं घटनास्थळी दाखल झाले.