शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ज्यामुळे गायकवाड यांना शिक्षा देखील होऊ शकते.
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ज्यामुळे गायकवाड यांना शिक्षा देखील होऊ शकते.
दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते दिपेंद्र पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 308 आणि 355 नुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
क्राईम ब्रांचकडे आता या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुरुवारी रात्री एअरलाईन्स आणि अधिकारी सुकुमार यांच्याकडून तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी कायद्यानुसार शुक्रवार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कायदे तज्ज्ञांच्या मते या कलमानुसार ७ वर्षाची शिक्षा होऊ शकते.